येत्या ११ एप्रिल २०१३ रोजी म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी आपले नवीन वर्ष सुरु होईल.
भारतीय नववर्षाचे प्राकृतिक महत्व:
# वसंत ऋतुचा प्रारंभ याच दिवसापासून होतो. सृष्टी या काळात फुला फळांनी बहरलेली असते.
# शेतीत कष्ट करून जे अन्न
शेतकरी पिकवतो त्याचे फळ मिळण्याचा हाच काळ असतो. त्यामुळे सर्वात आनंद, हर्ष
उल्हासपूर्ण असे वातावरण असते.
# भारतीय नववर्षाचे ऐतिहासिक महत्व :
हा दिवस सृष्टीच्या रचनेचा पहिला दिवस आहे. एक अरब 97 करोड़ 39 लाख 49 हजार 109 वर्षांआधी याच दिवशी सृष्टी निर्माण झाली.
# युगाब्द संवत्सर का प्रथम दिन : ५११२ वर्ष पूर्व युधिष्ठिरचा राज्यभिषेक याच दिवशी झाला
# विक्रमी संवतचा पहिला दिन: याच दिवशी त्या त्या काळातील
राजाच्या (ज्याच्या राज्यात चोरी होत नाही अथवा कोणी भिकारी नसे. तो राजा त्या काळातील चक्रवर्ती सम्राट असे) नावाने नवीन वर्ष भारतभर सुरु होते. सम्राट
विक्रमादित्य यांच्या नावाने २०६७ वर्षे आधी याच दिवशी राज्य स्थापना झाली.
# श्रीरामचंद्र यांचा राज्याभिषेक याच दिवशी करण्यात आला. याच दिवशी नवरात्र (शक्ति और भक्तिचे नऊ दिवस) सुरुवात होऊन नवव्या दिवशी श्रीरामांचा जन्मदिवस (श्रीराम नवमी) साजरा केला जातो.
# गुरू अंगददेव प्रगटोत्सव:
शीख परंपरेतील दुसरे गुरु अगददेव यांचा जन्मदिवस.
# समाजाला श्रेष्ठ (आर्य) मार्गावर घेऊन जाण्याच्या उद्देशाने स्वामी दयानंद सरस्वती यांनी याच दिवशी आर्य समाज या संस्थेची स्थापना केली.
# संत झूलेलाल जन्म दिवस :
सिंध प्रांताचे प्रसिद्ध समाजरक्षक वरूणावतार संत झूलेलाल यांचा जन्मदिवस
# शालिवाहन संवत्सर : विक्रमादित्य यांच्यासारखेच शालिनवाहन यांनी याच दिवशी हुणांवर विजय मिळवून दक्षिण भारतात श्रेष्ठ असे राज्य स्थापित केले
# संघ संस्थापक परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिवस.
सर्व बांधवाना अशा शुभ दिनाच्या आणि येणाऱ्या नववर्षाच्या आत्ताच
शुभेच्छा देतो. येणारे वर्ष आरोग्य, निरामय सुख-समृद्धी आणि भरभराटीचे जावो.
No comments:
Post a Comment